Posts

🙎🏻 *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान विशेष 🙎🏻 *आजीचा संघर्ष नातींच्या शिक्षणासाठी* *माझ्या शाळेत शिकणाऱ्या 4 मुलींच्या आजीच्या संघर्षाची दखल रायगड जिल्ह्यातील प्रिंट मीडिया व झी 24 तासने घेऊन आजीची संघर्ष गाथा संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवली.या आजीचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री.बाळाराम जाधव व मुख्याध्यापक सौ.अपर्णा कुलकर्णी मॅडमच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.* 3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा ,हा दिवशी महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो.मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईनी केलेले कार्य व आज मुलींच्या शिक्षणातील प्रगतीचा चढता आलेख पाहून सावित्रीबाईंच्या  150 वर्षापूर्वीची दूरदृष्टीची प्रचिती येते.आज पर्यंत मुलींना शिक्षणासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जात असल्याचे आपण पाहत आहोत पण एका निरीक्षर कातकरी आदिवासी जमतीमधील एका आजीचा तिच्या चार नातींच्या शिक्षणासाठी कसा संघर्षमय प्रवास सुरू आहे याचा आजच्या दिनानिमित्य आपल्या समोर मांडावा वाटला.  *रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील संतोषनगर या का...