🙎🏻 *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान विशेष 🙎🏻
*आजीचा संघर्ष नातींच्या शिक्षणासाठी*
*माझ्या शाळेत शिकणाऱ्या 4 मुलींच्या आजीच्या संघर्षाची दखल रायगड जिल्ह्यातील प्रिंट मीडिया व झी 24 तासने घेऊन आजीची संघर्ष गाथा संपूर्ण महाराष्ट्रात पोहचवली.या आजीचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष श्री.बाळाराम जाधव व मुख्याध्यापक सौ.अपर्णा कुलकर्णी मॅडमच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.*

3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा ,हा दिवशी महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो.मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाईनी केलेले कार्य व आज मुलींच्या शिक्षणातील प्रगतीचा चढता आलेख पाहून सावित्रीबाईंच्या  150 वर्षापूर्वीची दूरदृष्टीची प्रचिती येते.आज पर्यंत मुलींना शिक्षणासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जात असल्याचे आपण पाहत आहोत पण एका निरीक्षर कातकरी आदिवासी जमतीमधील एका आजीचा तिच्या चार नातींच्या शिक्षणासाठी कसा संघर्षमय प्रवास सुरू आहे याचा आजच्या दिनानिमित्य आपल्या समोर मांडावा वाटला.
 *रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील संतोषनगर या कातकरी आदिवासी पाड्यावर मी शिक्षक म्हणून कार्यरत आहे.* माझ्या शाळेत *करिश्मा व करिना पवार 5 वी व 2 री आणि रेश्मा व ममता कोळी 5 वी व 2 री या चौघी* मावस बहिणी शिक्षण घेत आहेत आणि यांना सांभाळणारी यांची वृद्ध *आजी बेबी शांताराम पवार* यांची ही संघर्षमय कथा आहे.
बेबी पवार या विधवा वृद्ध महिला आहेत , त्यांना दोन मुली आहेत त्या दोन मुलींपैकी  एकीला  4 मुली व दुसरीला 2 मुली, त्यांच्या घरात मुलगा नाही. बेबी पवार यांची मोठी मुलगी अलका हिला 4 मुली आहेत , वंशाला दिवा पाहिजे या हेतूने 4 मुलीच झाल्या. चार मुलींचा सांभाळ कसा करायचा या विचारणे अलकाने  करिश्मा व करीना या आपल्या दोन मुलींना कायमचे बेबी पवार कडे सोडून दिले.ज्या वेळी ती सोडून गेली त्या वेळी करिश्मा 5 व करीना 2 वर्षाची होती(आता त्या 11 व 8 वर्षाच्या आहेत). गेल्या 6 वर्षांपासून या मुलींचा सांभाळ त्यांची आजी बेबी पवार करत आहेत.
तसेच बेबी पवार यांची दुसरी मुलगी सविता , तिला 2 मुली पण वयाच्या 18 व्या वर्षी तिला विधवा पणाला सामोरे जावे लागले व तिने त्या दोन्ही मुली बेबी पवार कडे ठेवल्या.
अशा परिस्थितीत बेबी पवार आपल्या 4 नातींचा सांभाळ व त्यांचा शिक्षणाचा खर्च मोलमजुरी करून करत आहेत. *घरात आठरविश्व दारिद्रय राहायला मोडकी झोपडी, घरात वीज नाही, पाणी नाही तरी बेबी पवार आजीने  जगण्याची आस सोडली नाही.*  असलेल्या परिस्थितीला हिमतीने सामोरे जात त्या आपल्या 4 नातीना सांभाळत आहेत व शिकवत आहेत.
दररोज मोलमजुरी करून ,त्या  घरगाडा हाकत आहेत , *घरात कोणीही कर्ता पुरुष नाही व फक्त चार नाती व आपली विधवा मुलगी आशा 6 महिला घरात ,यांचा सांभाळ करण्याची सर्वस्व जबाबदारी बेबी पवारांची आहे.* त्या चार मुलींना त्या कधीही त्यांच्या आई वडिलांची जाणीव भासू देत नाहीत.
आजींचे खुप मोठे स्वप्न आहेत की आपल्या नाती शिकाव्यात ,मोठया व्हाव्यात व आपल्या पायावर उभ्या राहाव्यात.
मुलगा नसला तरी या चार नातीना त्या खुप जीव लावतात कुठल्याही गोष्टीची कमी त्या भासू देत नाहीत.अशा या कर्तृत्ववान आजीच्या कार्याला सलाम.
✍🏻...
*श्री.गजानन पुंडलिकराव जाधव*
*प्राथमिक शिक्षक*
*जि.प. शाळा संतोषनगर*
*ता.रोहा, जि.रायगड.*
*📱- 09923313777*
Email- gajanan.jadhav1984@gmail.Com

Comments